धाराशिव (प्रतिनिधी)- 12 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे पार पडलेल्या शालेय विभागीय स्केटिंग स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलची इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेली आरफिया अमजद पटेल हिने 14 वर्षीय मुलीच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून शालेय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सत्कारीत करून पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या सचिव प्रेमाताई सुधीर पाटील तसेच पालक व मार्गदर्शक उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व आठवीचे पर्यवेक्षक सुनील कोरडे यांनी तिचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक अमितकुमार लोमटे व राजाभाऊ पवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले.