धाराशिव, (प्रतिनिधी) - येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ हजार रुपये देण्यात आले. या रक्कमेचा धनादेश नुकताच जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी तसेच पुरामुळे जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम पुर्ण वाया गेला असून, अनेक जनावरे वाहून गेली आहेत, अनेक घरांची पडझड झाली आहे. अशावेळी सामाजिक भान ठेवून संस्थेच्या वतीने खारीचा वाटा समजून आपल्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकार्याकडे सुपूर्द केला आहे.
