धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकरी जगला पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे शेतकरी पुढे यावा सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली असल्या कारणाने येणाऱ्या काळात सुधारणा व्हावी म्हणून केंद्र सरकारने नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन रब्बी पिकाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी व्यक्त केले आहे.
श्री कोळगे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत गहू ,बार्ली , हरभरा ,मसूर ,मोहरी , तेलबिया , सूर्यफूल इत्यादी पिकामध्ये किमान आधारभूत किमतीच्या उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच देशांतर्गत डाळीचे उत्पादन वाढावे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देशाने मूग, उडीद , मसूर या डाळीची व गव्हाची मोठ्या प्रमाणात शासकीय पातळीवर खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे धान्य पडून राहणार नाही व त्याला भाव चांगला मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे कोळगे यांनी म्हटले आहे.