भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील आरसोली येथील नितीन श्रीधर गुंजाळ यांची मागील आठवड्यात राज्य रक्षक संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र पोलीस मित्र समितीच्या भूम तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य रक्षक संघाच्या माध्यमातून पोलीस मित्र समितीचे राज्यात मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरुद्ध लढा देऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्यांच्या कामात मदत करण्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्या अनुषंगाने राज्यात या समितीचा जास्तीत जास्त प्रमाणात विस्तार व्हावा. यासाठी मागील आठवड्यात महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समितीच्या वतीने अनेक ठिकाणी विविध पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते गुंजाळ यांना निवडीचे पत्र व ओळखपत्र देण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून पोलीस मित्र समितीचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून पोलिस प्रशासन आणि सर्सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पोलीस मित्र समितीकडे पाहिले जाते.आगामी काळात गाव तिथे पोलीस मित्र नेमणूक केली जाणार असल्याचे समितीचे तालुका अध्यक्ष नितीन गुंजाळ यांनी सांगितले.

 
Top