तुळजापूर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र. 9 मधील वडार गल्ली, वासुदेव गल्ली, जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरासह  भक्तनिवास परिसरातील रस्ते अनेक दिवसांपासून अंधारात बुडाले होते. स्ट्रीट लाईट बंद असल्याने भाविक आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत होता. या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांच्या हालचालीही वाढल्या होत्या.

या समस्येची दखल घेऊन जनसेवक अमित कुतवळ यांनी पुढाकार घेत 60 पोलांवर नवीन लाईट बसवून परिसर उजळला. या कामामुळे त्या भागातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच आता सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल घडवणाऱ्या या कार्याचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.


 
Top