धाराशिव (प्रतिनिधी)-  मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ व  चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने नुकत्याच 91 व्या वर्षी निधन झालेल्या महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडामंत्री व कबड्डी असोसिएशनचे राज्य पदाधिकारी, महाराष्ट्र  ऑलिंपिक असोसिएशन पदाधिकारी काम केलेले, खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व शामरावजी अष्टेकर व साई जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव स्वर्गवासी झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 

श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या श्रीच्या पूजा विधीसाठी गणेशोत्सवाच्या कालावधीत धाराशिवचे पालकमंत्री म्हणून असताना डॉ. पद्मसिंह पाटील व शामराव अष्टेकर हे खास उपस्थित राहून श्री ची पूजा विधि करून जनतेला  व मंडळाच्या कार्यकर्त्यास प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब वॉलीबॉल खेळामुळे नाव उज्वलतेकडे घेऊन जाणाऱ्या खेळाडूंना, गवळी गल्ली ही क्रीडापट्टूंची  व समाजसेवेचे व्रत  घेऊन कार्य करणाऱ्या या गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते मैदानावरील खेळाडूंचे वागणे  सर्वधर्मसमभावाचे वर्तन असते ते मला आल्यानंतर जाणवले आहे.  अष्टेकर हे मूळ क्रीडापटू परंतु समाजसेवा व राजकारण अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थी व त्याग पूर्ण या भूमिकेतून कराड यासारख्या शहरातील नगर परिषदेमध्ये 43 वर्ष नगराध्यक्ष पद उपभोगणारे व दोन वेळेस विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे कबड्डी खेळाडू होते . असे गणेश मंडळाच्या व्यासपीठावरून उद्गार काढणारे व्यक्तिमत्व होते .याची आठवण प्रा.गजानन गवळी, मनमत आप्पा पाळणे, काशिनाथ दिवटे ,नरसिंग साखरे ,अंकुश पाटील, राजकुमार दिवटे, रवींद्र जानगवली यांनी विविध त्यांचे अनुभव खेळाडू वृत्तीची क्रीडा क्षेत्रातील आठवणी जाग्या करीत गेल्या. धाराशिवातील व महाराष्ट्रातील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यकार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मार्फत जीवनसाधना पुरस्कार मिळालेले. विविध पुस्तके ग्रामीण भागावरच लेखन साहित्य.. महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ दर्जाचे अनुभवावर लेखन, महाराष्ट्रात मराठी साहित्य संमेलनामध्ये अग्रभागी असणारे हे साहित्यिक यांचेही नुकतेच निधन झाले. प्रा भालचंद्र हुच्चे यांनी  चंदनाशिव यांच्या साहित्य बद्दलचा उल्लेख व आठवणी जागृत केल्या या दोघांनाही मंडळाचे वतीने श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमास व्हॉलीबॉल खेळाडू ,शिवछत्रपती पुरस्करते व गुणवंत कामगार पुरस्करते इ. मंडळाचे पदाधिकारी व  लहानथोर सदस्य उपस्थित राहून भावपूर्ण  श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे संचलन प्रा भालचंद्र हूच्चे यांनी केले आभार दिवटे यांनी मांनले.

 
Top