परंडा (प्रतिनिधी)- सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनेक गावे उध्वस्त झाली होती अनेक शेतकऱ्यांचे,कामगारांचे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य या पावसामध्ये वाहून गेले होते तेव्हा गोरगरीब वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून परंडा येथील जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव दाभाडे या स्मारक समितीच्या वतीने संस्थेचे सचिव किसन थुल यांच्या वतीने पूरपरिस्थिती मुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांच्या पाल्यांना मदतीचा हात देण्यासाठी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल,शाळेची पिशवी,पॅड,तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने फुले आंबेडकर विद्वत महासभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,तालुका उपाध्यक्ष अरुण सोनवणे,मधुकर सुरवसे,देवा ब्रह्मराक्षस त्याचबरोबर जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब बल्लाळ सर,सुभाष भालेराव सर,बोकेफोडे मॅडम उपस्थित होते.सामाजिक बांधिलकीतून उभा राहणारा हा आशेचा किरण असून पूरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा लहानसा प्रयत्न आहे.अशा सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे मत धनंजय सोनटक्के यांनी व्यक्त केले.याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेचे शिक्षक सुभाष भालेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आमच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मिळाली आहे असे मत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.