नळदुर्ग (प्रतिनिधी)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन मुले आणि मुलींच्या कुस्ती स्पर्धा 2025 चे आयोजन दि. 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले आहे. 

या स्पर्धेचे उद्घाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर मराठवाडा विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ  क्रिडा विभागाचे संचालक डॉ.सचिन देशमुख, ऑलंपिक संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रजित जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेती कु. गौरी शिंदे, पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्यासह संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास गावातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी केले आहे.

 
Top