धाराशिव (प्रतिनिधी)- “फेसा“ फर्स्ट इयर स्टुडन्ट इंजिनिअरिंग असोसिएशन अर्थात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विद्यार्थी संघटनेचे नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले.

 “फेसा“च्या माध्यमातून वर्षभरात विविध ऍक्टिव्हिटीज चे आयोजन केले जाते. प्रथम वर्ष अभियांत्रिकी च्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांच्या आधारावर त्यांची मुलाखत घेऊन “फेसा“च्या कार्यकारिणीची  निवड करण्यात आली. आणि या फर्स्ट इयर इंजीनियरिंग असोसिएशनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा विभाग प्रमुख डॉ.उषा वडणे, सर्व विभागांचे विभाग प्रमुख  डॉ. डी. डी. दाते, डॉ.पी एस कोल्हे, प्रा. ए झेड पटेल, प्रा. पी एम पवार, डॉ. प्रीती माने, प्रा. डी.एच. निंबाळकर, प्रा. सुनीता गुंजाळ, संजय मैंदर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे म्हणाल्या की “फेसा“चे  उद्घाटन करताना दरवर्षी वेगळा अनुभव येतो.परंतु यावर्षीच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद देत अल्पकाळामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने “फेसा“चे संघटन करून या माध्यमातून पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन करून स्वतःमध्ये असलेल्या बुद्धिमत्तेची आपल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चुणूक दाखवलेली आहे. या गोष्टीचा आम्हाला नक्कीच अभिमान आणि विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते.आणि विद्यार्थी आपले हेच कौशल्याचे सातत्यपूर्ण चार वर्ष ठेवतील. अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की यावर्षी शिक्षक दिन ते अभियंता दिन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सादर करून इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुद्धा स्वतःकडे लक्ष वेधून घेतले. या प्रोजेक्टमुळे विद्यार्थ्यांचे समाजामध्ये सुद्धा खूप ठिकाणी कौतुक झाले.याचाच परिपाठ म्हणून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने आपली प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंट केले आहेत. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी ए आय वर खूप चांगले प्रोजेक्ट सादर करून अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आपण मागे नाहीत हे दाखवून दिले. कौशल्यावर आधारित महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध कोर्सेसचा या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. जेणेकरून सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना तात्काळ मोठ्या पॅकेजच्या संधी सहज मिळू शकतील.

 यावेळी प्राचार्य डॉ. माने यांनी आवर्जून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय  सिम्बॉयसिस स्किल युनिव्हर्सिटीशी संलग्नित असून दिवाळीनंतर याचे कोर्सेस सुरू होत आहेत.ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले.आणि याचाही विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सेक्युरिटी, वुमन्स एम्पॉवरमेंट, होम सेक्युरिटी, ग्रीन सिटी, रिनेव्हेबल एनर्जी, हायड्रोजन सोलर पॅनल, रेन डिटेक्टर  अशा नाविन्यपूर्ण विषयांचा पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशन साठी  अंतर्भाव केला होता. यावेळी तेरणा रेडिओचे संजय मैंदर्गी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत  कु. श्वेता माने आणि टीम यांनी म्हटले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पाटील यांनी केले.

 पोस्टर प्रेसेंटेशन मधून एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन वर प्रोजेक्ट सादर केलेल्या प्राजक्ता कदम आणि तृप्ती गायकवाड ला प्रथम क्रमांक मिळाला. तर इनव्हिसिबल इंजिनसाठी अक्षरा झिरमिरे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वुमन एम्पॉवरमेंट या नावीन्यपूर्ण पोस्टर साठी सय्यद मिसबा ला तृतीय क्रमांक मिळाला.

प्रिया ढोबळे, अंजली सानप  विद्यार्थ्यांना अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला. प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लेझर अँड सेक्युरिटी सिस्टिम, रॉक  अँड पिनियन,  जेट इंजिन, लाईट फिडीलिटी हे प्रोजेक्ट सादर केलेले विद्यार्थी रेयान मोमीन , मुसेफ काझी, निकम प्रतीक, शिंदे प्रज्ञा, गवळी सार्थक, रोहिणी सुकाळे, श्रद्धा देटे, दिग्विजय बीटे,गणेश रणखांब , देवराज मेंढे यांना अनुक्रमे बक्षीस मिळाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रोजेक्ट आणि मॉडेल प्रेझेंटेशन ला  परीक्षक म्हणून लाभलेले डॉ. पी. एच. जैन, प्रा. ए.डी बोरकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, प्रा. रोहिणी बोंडगे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.  पोस्टर प्रेझेंटेशन साठी प्रथम वर्ष विभागाचे  प्रा.बालाजी चव्हाण, प्रा.एम व्ही जोशी, प्रा. डी.डी मुंडे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. आरती शिंदे,सतीश नेपते, प्रद्युम्न वाघमोडे व दिगंबर जाधव यांनी परिश्रम घेतले.


 
Top