धाराशिव (प्रतिनिधी)- कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापुरला पायी चालत जाणा-या भाविकांनी मल्टिमीडिया प्रदर्शनच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजंनाचा लाभ घ्यावा.असे आवाहन डॉ.निलेश देशमुख यांनी केले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर,जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पोलीस प्रशासन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी टोल प्लाझा येथे 11 वर्षे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय डिजिटल मल्टिमिडीया प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी डॉ.देशमुख बोलत होते.
प्रदर्शनचे उदघाटन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे आणि तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आले.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव,पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर,तामलवाड़ी टोल प्लाज़ाचे व्यवस्थापक विवेक गडीकर,सहायक व्यवस्थापक किरण भगत,शाहू भोसले,श्रीनिवास साळुंके आदि मान्यवर उपस्थित होते.
खडसे म्हणाले की,केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजना,जल जीवन मिशन,महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारतसारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब व मध्यम कुटुंबातील लोकांचे जीवनमान उंचावले आहे.तसेच देशामध्ये विविध पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या विकासकामामुळे नागरिकांचे आयुष्य आरामदायी व सुखकर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत आणि कणखर निर्णय आणि विदेश नीतीमुळे भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये गाजत आहे असे यावेळी श्री.खडसे यांनी सांगितले.
अश्विन पौर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानी देवीजींची निघणारी छबिना मिरवणूक पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलंगाना आणि महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून येणाऱ्या बहुभाषिक भाविकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती मिळावी या अनुषंगाने केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने मोठ्या एल.ई.डी स्क्रीनचा माध्यमातून मराठी,तेलगु आणि कन्नड भाषेतून माहिती उपलब्ध केली आहे.असे अंबादास यादव यांनी प्रास्ताविकेतून सांगितले तसेच पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील 11 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी,देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहितीसह विकसित भारताचा अमृत काळामध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे.असेही यादव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संतोष पवार यांनी मानले.हे प्रदर्शन दिनांक 6 ऑक्टोबरपर्यंत 24 तास सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.प्रदर्शनातील चित्रे व मजकूर डिजिटल एल ई डी स्क्रीनमध्ये असल्याने रात्रीच्या वेळी पाहण्याचे विशेष आकर्षण असणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाविकांना अल्पोपहार देण्यात आले. सांगोला येथील जय भवानी कलापथक पथकाचे शाहीर सुभाष गोरे आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी पोवाड्याच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची माहिती देऊन भाविकांचे विविध भक्तिगीतांनी मनोरंजन केले. प्रदर्शनच्या आयोजनसाठी केंद्रीय संचार ब्यूरोचे कार्यालय सहायक जे.एम.हन्नुरे,योगी कोंडाबत्ती,निलेश कोटा,तामलवाड़ी पोलिस प्रशासन व टोल प्लाजाचे श्री शिंदे,आदी कर्मचा-यानी सहकार्य केले.