धाराशिव (प्रतिनिधी)- अवैध गांजा विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, एक इसम वाशी पोलीस ठाणे अंतर्गत मांडवा येथे गांजा विक्री करता येणार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पोस्टे वाशी पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता एक इसम आणि 07 पॉकेट गांजा मिळून आला. त्यास तात्काळ ताब्यात घेऊन घटनास्थळावरून 14.236 किलो हिरव्या रंगाचा उग्र वास येत असलेला गांजा एकूण किं. 2 लाख 84 हजार 720 रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव- संजय अर्जुन शिंदे वय 35 वर्षे रा. मांडवा ता. वाशी, जि. धाराशिव असे असून त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नमूद आरोपीने सदरचा गांजा कुठून आणला तसेच तो कोणाला विक्री करत होता याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, दत्तात्रय राठोड, फरहान पठाण, दयानंद गादेकर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोह सुभाष चौरे, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, पोह बाबा जाधवर पोस्टे वाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल मलंगनेर पोस्टे वाशी, नागनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.