भूम (प्रतिनिधी)- कासारी अतिवृष्टी व पावसामुळे पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन अन्नधान्य सह कपडे, संसारोपयोगी साहित्य, वाहून गेले होते अशा नुकसानग्रस्त नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईक,आमदार प्रा डॉ तानाजी सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक युवासेना निरीक्षक बाजीराव  चव्हाण सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या वतीने जीवनावश्यक साहित्य व खाद्यपदार्थांचे किडचे वाटप, शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पूरग्रस्त नागरिकांना, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त,मायेचा आधार मिळत आहे याबद्दल नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यावेळी शिवसेना सरपंच सुनील घाडगे, युवा सेनेचे अजित पाटील, शिवाजी पाटील, बालाजी वारे. धनंजय पाटील, कानिफ घाडगे, तानाजी पाटील,गावातील नागरिक महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top