धाराशिव (प्रतिनिधी)-  अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत घरदार,संसार उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून दिलासा मिळू लागला आहे.पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या एकूण 1373 कुटुंबांना मागील दोन दिवसात प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण 3206 कुटुंबे पुराच्या पाण्याने बाधित असून त्यांना मदतीसाठी पात्र धरले गेले आहे. यामध्ये धाराशिव 217, तुळजापूर 105, उमरगा 250, कळंब 413, भूम 712, परंडा 1400 आणि वाशी 109 कुटुंबांचा समावेश आहे. 29 सप्टेंबर रोजी 353 कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. यामध्ये धाराशिव 65, कळंब 208 व परंडा 80 कुटुंबांचा समावेश आहे. तर 30 सप्टेंबर रोजी 1020 कुटुंबांना दिलासा देण्यात आला. त्यामध्ये धाराशिव 50, कळंब 40, भूम 508, परंडा 313 व वाशी 109 कुटुंबांचा समावेश आहे.

या दोन दिवसांत धाराशिव तालुक्यातील 115, कळंब 248, भूम 508, परंडा 393 व वाशी 109 कुटुंबांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे. पूराच्या पाण्याने उध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी ही आर्थिक मदत दिलासादायक ठरत आहे.प्रशासनाकडून उर्वरित पात्र कुटुंबांनाही लवकरच मदत पोहोचवली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 
Top