धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व येथील ऊसतोड कुटुंबातील मुलगा बुद्धभूषण बाळासाहेब टोंपे याचा गोंदिया येथील शासकीय मेडीकल महाविद्यालयास एमबीबीएसला प्रवेश निश्चित झाला आहे. त्याबद्दल त्याच्या घरी जाऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्याच्यासह आई-वडील यांचा सत्कार केला.
याप्रसंगी लोहटा पूर्व गावचे उपसरपंच काकासाहेब अडसूळ, गणेश आडसुळ, बाळासाहेब अभंग, माने बाप्पा, शरद ठाकूर, काका चव्हाण, शिवाजी शिरसाट, पप्पू डोंगरे, भारत शिंदे, तनुजा टोंपे, रामचंद्र ढगे, लक्ष्मण गायकवाड, जरीचंद टोपे, जयश्री टोंपे, अनिता टोपे, सुमन टोंपे, अनिल शिरसट, बापू टोंपे आदींच्या उपस्थितीत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
