धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. तसेच मुंबई येथे संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन होणाऱ्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्ह्यातील न. प. निवडणुका स्वबळावर लढवावी का अशी मागणी करण्यात आली आहे. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, धाराशिव शहप्रमुख आकाश कोकाटे उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींची निवडणूक स्वबळावर लढवावी की महायुतीकडून याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. दोन महिन्यांवर निवडणुका आल्यामुळे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यातून पक्षश्रेष्ठींची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेवून या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.

 
Top