धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. तुकाराम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य सचिव संजय मोरे व दुसरे सचिव किरण पावसकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

ॲड. तुकाराम शिंदे हे शिवसेना राज्य आंदोलन समन्वयक पदावरही कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून ही निवड करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व आमदार किशोर दराडे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिवकण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करून सर्वांना सोबत घेवून कार्य करावे असे नियुक्तीपत्रात नमूद म्हटले आहे. या निवडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांमधून स्वागत होत आहे.

 
Top