धाराशिव (प्रतिनिधी)- वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम शाहु नगर येथील नालंदा बौद्ध विहारात पुज्यणीय भिक्खुणी मेत्ताजी आर्या,बुध्द सृष्टी कळंब यांच्या उपस्थितीत धम्मदेसना देऊन संपन्न झाला,तिन महिन्यात वर्षावास निमित्ताने नालंदा बौद्ध विहारात महिला भगिनींनी बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसार करीता बुध्द वंदना,वाचन करण्यात आले,कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सामुदायिक 

बुद्ध वंदना घेण्यात आली,पुज्यणीय भिक्खूणी मेत्ताजी आर्या यांनी धम्मदेसना दिली,भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मतदार जनजागरण समितीच्या वतीने बलभीम कांबळे यांनी संविधान उद्देशिका व विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या,मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,भोजन दान देण्यात आले,यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या शिलाताई चंदनशिवे,विजयमाला धावारे,काजल गायकवाड,मिरा शिंदे,कल्पना कांबळे,संगिता नागटिळक,शिलाताई पवार, संगिता वावळकर,शोभा चंदनशिवे,नंदा कांबळे,अनिता ठोकळ,आशा गायकवाड,सुलेखा घरबुडवे,ऍड.अनुरथ नागटिळक,नागनाथ गोरसे,प्रा.रवि सुरवसे,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,बापु कुचेकर,गणेश वाघमारे,बापु धावारे,आनंद घाडगे,बाळासाहेब माने,सह इतर उपस्थित होते.

 
Top