भूम (प्रतिनिधी)- येथे  पारंपारिक पद्धतीन दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा येथे एकत्र येत पेठ विभागातुन वाजत गाजत शहराच्या सिमेवर जावुन सिमोलघ्घन साजरे करत एकमेकांना सोने देत दसरा सण साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे   यांच्या हस्ते आपट्याच्या पानाची विधीवत पुजा करण्यात आली. पुजा केलेले सोने घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती . यावेळी प्रदीप देशमुख , सुरेश नाईकवाडी, सुर्यकांत, मारुती जाधव, बंडू खुळे, सुमत देशमुख, अशोक देशमुख , श्रीकांत दिक्षीत , बाळासाहेब खुळे ,विनोद देशमुख , सुनील थोरात, अनील बुरटे , बाळू बुरटे ,संजय साबळे ,बाळासाहेब गवळी ,वसंत लाडेकर ,विठू लाडेकर यानंतर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आसलेल्या देवी मंदीर व कसबा येथील देवी मंदीरात दर्शनासाठी पाच वाजल्यापासून रांगा लागल्या होत्या . भूम शहरात सकाळपासूनच दसऱ्याचे उत्साही वातावरण होते .त्यानिमित्त बाजारपेठ गजबजून निघली होती .शहरातील सर्व मंदिरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली.

 
Top