भूम (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबीयांना व पशुधन मृत झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तालुक्यातील 32 गावांमधील 712घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबीयापैकी 508 कुटुंबांना 52 लाख 80 हजार तर पुरामुळे मृत झालेल्या पशुधनाला.15 शेतकऱ्यांच्या 26 पशुधनाचे 9 लाख 57 हजार पाचशे रुपये खात्यामध्ये दि. 30 सप्टेंबर रोजी जमा झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यासाठी पाच व घरगुती भांडी वस्तू करिता दहा हजार रुपये निधी कुटुंबीयांच्या खात्यावर जमा होणार आहे तर उर्वरित 204 कुटुंबीयांना दोन दिवसांमध्ये निधी मिळणार आहे .पहिल्या टप्प्यात प्रत्यक्षात मृत पशुधन व पंचनामे झालेल्या पशुधनाचा निधी पशुधन शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे तसेच इतर राहिलेल्या शेतकऱ्यांचेपुढील दोन दिवसांमध्ये त्याही शेतकऱ्यांचा निधी जमा होणार आहे .असे तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
