भूम (प्रतिनिधी)-  कुंथलगिरी येथे झालेल्या 14 वर्ष वयोगटामध्ये 200 मी धावणे कुमारी आनंदी सपकाळ प्रथम क्रमांक, 80 मीटर अडथळा शर्यतीमध्ये कुमारी क्रांती खंडेकर प्रथम क्रमांक, 200 मी. धावणे व 80 मी. अडथळा शर्यती मध्ये कु .शशिकांत दराडे दुसरा क्रमांक, 17 वर्ष वयोगटांमध्ये खालील विद्यार्थी  200 मिटर धावणे कु . शिवज्ञा बोराडे दूसरा क्रमांक, 100 मी. अडथळा शर्यत कु. घावटे संस्कृती प्रथम क्रमांक. वरील सर्व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.

सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे, सचिव तथा पर्यवेक्षक सतीश देशमुख, हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव भोसले, भूम गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी साळुंखे, क्रीडा शिक्षक जयंत शिंदे व अप्पा मिसाळ यांनी केला .प्राथमिक शाळेचे सहशिक्षक भूपाल सिंह गायकवाड यांनी कुमारी क्रांती खांडेकर या होतकरू खेळाडूला पाचशे रुपये बक्षीस म्हणून दिले .सर्व विजय खेळाडूचे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
Top