धाराशिव (प्रतिनिधी) - अक्षरवेल महिला साहित्य मंडळ धाराशिवच्या माध्यमातून वाघेगव्हाण या पूरग्रस्त भागातील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.

अक्षरवेल महिला साहित्य मंडळ ही धाराशिव शहरातील एक साहित्यिक महिला चळवळ आहे. साहित्यिक वारसा असूनही सामाजिक बांधिलकीचं भान जपणाऱ्या साहित्यिक महिला एकत्र येऊन  जमा केलेल्या वर्गणी मधून शालेय साहित्याची खरेदी करून या सगळ्या महिलानीं  वागेगव्हण  या पूरग्रस्त गावी जाऊन तेथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वडनेर या गावातील पूरग्रस्त ग्रामस्थ महिलांना कपडे,साड्या आणि भांडी यांचे हे वाटप करण्यात आले.

पूरग्रस्त भागाची पाहणी केली असता  गावकरी, शिक्षक यांच्याशी साधलेल्या संवादा नंतर या सगळ्या  महिलांच अंत:करणं भरून आले.पूरगृरस्त भागातील ग्रामस्थांकडून ऐकलेल्या व्यथा या मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. अजूनही भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकांचे चेहरे निर्विकार दिसत होते.ते सर्व चित्र पाहून अक्षरवेल महिला सदस्यांची मनं विषन्न होती.

मोडून पडला संसार

पण मोडला नाही कणा 

पाठीवरती हात ठेवून

सर फक्त लढ म्हणा 

 या परिस्थितीला कुसुमाग्रजांची ही कविता सार्थ ठरली आणि या चिमुकल्यांना केवळ भावनिक आधार देणे हे महत्त्वाचे होते याच उद्देशाने  पूरग्रस्तांची ही भेट याचसाठी आम्हाला महत्त्वाची वाटली .असे कमलताई नलावडे यांनी सांगितले. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक कमलताई नलावडे, डॉ. अनार साळुंखे, डॉ ‌ रेखा ढगे, डॉ.सुलभा देशमुख, प्रा.विद्या देशमुख,शिवनंदा माळी, जयश्री फुटाणे, सारिका देशमुख ,सविता गुंड इ.सदस्य उपस्थित होते.

 
Top