तुळजापूर (प्रतिनिधी) -तालुक्यातील चिंचोली येथील शेतात असणारे ५५कट्टे ५५क्विंटल ऐकुण किंमत ७५!हजार रुपयाचे चोरून नेल्याची घटना बुधवार दि८रोजी राञी घडली.आधीच अतिवृष्टीबाधीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता चोरटे हैराण करीत असल्याने ग्रामीणभागात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे
या बाबतीत अधिक माहीती अशी कि चिचोली ता तुळजापूर येथील -बालवीर बलभिम पाटील, वय ७० वर्षे, रा. चिंचोली ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचे चिंचोली शिवारातील शेतातील सोयाबीनचे ५५कट्टे ५५ क्विंटल एकुण७५,००० किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि ०८/१०/२५ रोजी ११ ते दि.९/१०/२०२५रोजी ०५.००वा चोरुन नेले. अशी फिर्याद बालवीर पाटील यांनी ? दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे