धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्र सेविका समिति धाराशिव जिल्ह्याचा दिनांक 4 ऑक्टोबर शनिवार रोजी विजयादशमी उत्सव तसेच सघोष पथसंचलन झाले.यामध्ये धाराशिव,तुळजापूर, कळंब,तेरखेडा,वडगाव इत्यादी ठिकाणच्या एकूण 120 सेविकांचा सहभाग होता.विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील तसेच प्रसिद्ध दंतरोग तज्ञ मंजुळाताई पाटील याही उपस्थित होत्या..बालाजी मंदिर  मारवाड गल्ली तसेच नेहरू चौक गुजर गल्ली परिसरातून हे संचलन निघाले.संचलनाचे परिसरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करत उत्साहाने स्वागत केले. संचलनातील स्त्री शक्तीचे संघटन, उत्कृष्ट घोष,शिस्त, एकरूपता पाहून आजूबाजूचे वातावरण एकदम उत्साही होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्र सेविका समितीच्या कार्यकर्त्या,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक,परिसरातील नागरिक यांनी मेहनत घेतली.

 
Top