धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक सोयाबीन असल्याने त्याची काढणी मळणी झालेली आहे. अतिवृष्टीने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शिल्लक काढलेले सोयाबीन बाजारामध्ये 3000 ते 3500 भावाने व्यापारी घेत आहेत. सोयाबीनची 5328 रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने शासकीय खरीद नाफेड नोंदणी व खरेदी तात्काळ सुरु करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

अगोदरच अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यावर कमी भावामध्ये सोयाबीन विकण्याची वाईट वेळ आलेली आहे.शेतकऱ्यांना या आर्थीक संकटामधून वाचण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून केंद्र शासनाने जाहीर केलेला हमी भाव 5328 प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यासाठी नाफेडची खरेदीकेंद्र तात्काळ सुरु करावीत, त्याची नोंदणी चालु करण्यात यावी यासाठी संबंधीतांना आदेशीत करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा. नसल्यास भावांतर योजना लागु करावी अशी मागणी केली आहे. 

 
Top