परंडा प्रतिनिधी - परंडा शहरातील खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे.हे नाव आहे उमेश भास्कर सोनवणे. कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी त्यांची वैद्यकीय मदत (शिवसेना शिंदे गट) पदी निवड करण्यात आहे. आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्याची दमदार 'पार्श्वभूमी उमेश सोनवणे हे उच्चशिक्षित असून त्यांना शासकीय कामाचा अनुभव असलेले व न.प. परंडा 2016 सालाच्या प्रभाग 8 मधून उमेदवारी लढवली होती.त्यांना थोड्या मतानीमतदानरूपी निराशा पदरी पडली होती. यावेळी प्रभाग 10 (अ) चे ते प्रबंळ दावेदार मानले जात आहेत. यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नसून तर लोकांच्या समस्यांचे समाधान करणे आहे. त्यांनी केलेल्या कामांची यादी खूप मोठी आहे.
मजूर' शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी लेखनी स्वरूपात सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. प्रशासकीय समन्वय स्तरावरील गुंतागुंतीची सरकारी कामे सामान्य नागरिकांसाठी सोपी करणे, हा त्यांचा विशेष हातखंडा आहे. नागरिकांची शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची कार्यशैली प्रभावी ठरली आहे.
संकटात सापडलेल्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने किट आणि मदत पुरवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.मुख्यमंत्री सहाय्यता निधीसारख्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्या साठी त्यांची - शिवसेना जिल्हाअध्यक्ष (भूम परंडा वाशी) वैधकिय मदत कक्ष पदी सहा महिन्या करिता नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकांचा ऑयकॉन यांचा तरुणांमध्ये मोठा दांडगा संपर्क असून त्यांच्या साधेपणा आणि थेट लोकांशी संवाद साधण्याच्या शैलीमुळे ते युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत. विकासाची नवी आशा अभ्यासू आणि अनुभवी असलेल्या उमेश सोनवणे यांच्या कडे सामान्यजनता मोठी आशा ने पाहत आहे. स्थानिक राजकारणातील घराणेशाही आणि पारंपरिक नेतृत्वाला आव्हान देत, ते एक विकासाभिमुख आणि पारदर्शक राजकारणाचा आदर्श घालून देण्यास सज्ज झाले आहेत.त्यांच्या एका बदलत्या युगाचा आणि दुर्लक्षित भागाला न्याय मिळवून देणारा सक्षम प्रतिनिधी मिळेल अशी खात्री जनतेला वाटत आहे.
पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने विकासरत्न माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैधकीय मदत कक्ष प्रमुख मंगेशची चिवटे महाराष्ट राज्य संपर्क प्रमुख संचिन मांजरे पाटील याच्या प्रसिद्ध पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.