तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सर्वसाधारण महिला या आरक्षणाच्या सोडतीनंतर मंगरुळ पं.स.गणात राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना तालुका प्रमुख, संचालक खाजगी विद्या संस्था, ऊर्जावान आणि जनतेच्या मनाशी घट्ट नातं जोडलेले नेते  श्री. विरेश सुरेशराव डोंगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

श्री. डोंगरे हे तुळजापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. सुरेश यशवंतराव डोंगरे यांचे सुपुत्र असून, डोंगरे घराणे हे गेल्या अनेक दशकांपासून जनतेच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

कै. सुरेश पापा डोंगरे यांनी आपल्या कार्यकाळात सर्व समाजघटकांना सोबत घेत लोकहितासाठी काम केले. त्यांची लोकसेवेची हीच परंपरा विरेश दादा डोंगरे आज अभिमानाने पुढे नेत आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन वाटप, लघुउद्योगांना चालना, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य, आरोग्य सेवा शिबिरे, तसेच क्रीडा प्रोत्साहन उपक्रम राबवून त्यांनी लोकांमध्ये विश्वास आणि आत्मीयता निर्माण केली आहे. डोंगरे घराण्याची जनसेवेची परंपरा, सर्वसमावेशक नेतृत्व, आणि युवकांतील लोकप्रियता पाहता विरेश दादा डोंगरे हे मंगरुळ गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

 
Top