धाराशिव (प्रतिनिधी)-तुळजापुर तालुक्यातील सलगरा (दि), वडगाव (देव), जवळगा (मे) होनाळा व काक्रंबा तसेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या.
तुळजापुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा धाराशिव जिल्ह्यात रौद्ररूप धारण केले आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू असून बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे परतीच्या पावसामुळे उरले सुरले सोयाबीन देखील हातातून निघून जाण्याचे चिंता शेतकरी वर्गास भेडसावत असून शासनाकडून केवळ तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे खासदार ओम प्रकाश राजा निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी शाम पवार ऋषीभैय्या मगर, ॲङ श्री. ढवळे, गौरीशंकर गोडगिरे, शाम माळी, गोपाळ सुरवसे यांच्यासह परीसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरीक मोठया प्रमाणावर उपस्थीत होते.