भूम (प्रतिनिधी)- सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी करावी या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून उपोषणास बसलेल्या हभप सतीश कदम महाराज यांच्या उपोषणास पाठिंबा दिला म्हणून भूम येथे काल लाक्षणिक रास्ता रोको व आंदोलन केलेल्या तालुक्यातील 80 शेतकऱ्यावरती पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केल्याने आज शेतकऱ्यावरती गुन्हे कशामुळे दाखल केले याची विचारणा धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दूरध्वनी द्वारे भुम येथील पोलीस निरीक्षक यांच्याकडे दूरध्वनी द्वारे केली असता पोलीस निरीक्षकाने खासदारांचा फोन कट करून हे शासन शेतकऱ्यांच्या किती विरोधात आहे. याचा आज प्रसंग वाढवल्याने शेतकरी वर्गातून संतापाची लाट उसळली असुन उपस्थित शेतकरी खासदार निंबाळकर यांच्यासह उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून शासनाचा निषेध नोंदवला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या पाच दिवसापासून भूम येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या ह भ प सतीश कदम महाराज यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून केलेल्या लाक्षणिक रस्ता रोकोत सहभागी का झालात म्हणून काल तालुक्यातील 8 शेतकऱ्यांना पोलीस प्रशासनाने नोटीसा दिल्या. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, भूमचे उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे ,तहसीलदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भूम येथील उपविभागीय कार्यासमोर उपोषण करते हभप सतीश महाराज यांच्याशी चर्चा करत असताना खासदार निंबाळकर यांनी भूम येथील पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांना फोन लावून शेतकऱ्यांनी केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून केलेल्या लाक्षणिक रस्ता रोकोस सहभागी झालेल्या शेतकऱ्यावरती गुन्हे का दाखल केले, याबाबत विचारले. पोलीस निरीक्षक कानगुडे यांनी खासदार निंबाळकर यांचा दूरध्वनी कट केला. यानंतर खासदार निंबाळकर यांनी यांच्या दूरध्वनीवरून पोलीस निरीक्षकानी फोन लावला असता तोही फोन कट करून बोलण्यास असमर्थता दाखवली. याबाबत खासदार निंबाळकर यांनी उपभागीय कार्यालयात शेतकऱ्यासह ठाण मांडून अधिकाऱ्या बरोबर चर्चा करून संबंधितांनी माझ्याविषेश अधिकाराचा भंग केला असल्याचा उल्लेख करून याबाबत मी तक्रार करण्यास असल्याचे सांगून अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली. याबाबत खासदार निंबाळकर यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर ही दूरध्वनी द्वारे चर्चा करून हभप कदम महाराज यांच्या उपोषणाबाबत पाच दिवस होऊनही प्रशासन दखल घेत नसल्याचे सांगून याबाबत तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीत पाटील भूम तालुका प्रमुख अनिल शेंडगे आरोग्य विलास पवार भूमचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह थोरात, दिलीप शाळु, अनिल शेंडगे, झीनत सय्यद ,प्रल्हाद आडागळे ,चेतन बोराडे ,भगवान बांगर ,दीपक मुळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान काल झालेल्या आंदोलनाबाबत उशिरा गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षकाविषयी शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून या अगोदरही धनगर समाजाच्या झालेल्या आंदोलनानंतर त्यांनी गुन्हे दाखल केले आहेत तेव्हा अशा अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी संतप्त शेतकऱ्यातून होत आहे.