धाराशिव (प्रतिनिधी)-  शेतकऱ्यांची प्रगती हीच कारखान्याची खरी प्रगती आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच रूपामाता उद्योग समूह सातत्याने प्रगतीपथावर आहे. यावर्षीही सर्वांच्या सहकार्याने विक्रमी गाळप करून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील. असे प्रतिपादन रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव गुंड यांनी केले. 

धाराशिव तसेच औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासाचा केंद्रबिंदू असलेल्या रूपामाता ॲग्रोटेक प्रा. लि. पाडोळी (आ) या साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड गुरुजी, रूपामाता उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक ॲड. अजित गुंड पाटील, प्रगतिशील शेतकरी शाहूराज गुंड, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, डेप्युटी चीफ इंजिनिअर संजय गुंड, चीफ केमिस्ट एडके, शेतकी अधिकारी प्रेमनाथ पाटील, केन ऑफिसर धनंजय गुंड, सुरक्षा अधिकारी लोकरे, तसेच ग्रामस्थ, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, नव्या हंगामासाठी उपस्थित मान्यवरांनी कारखाना प्रशासन आणि शेतकरी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

 
Top