भूम (प्रतिनिधी)- ऐन दिवाळीत भूम शहरात मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरामधील तीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. भूम तालुका दूध संघ परिसरात दि. 20 ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री ॲड चंद्रकांत डमरे यांच्या घरात काही अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून पैसे व वस्तू लंपास केले आहेत.
अधिक माहिती अशी की भूम दूध संघाच्या इमारतीच्या पाठीमागे ॲड डमरे यांचे घर आहे .घरामध्ये कोणी नाही याचा फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरामध्ये शिरून कपाटाचे कुलूप तोडले व कपाटांमधील अंदाजे 30 हजार रुपये लंपास केले आहेत .सकाळी पोलीस प्रशासनाने चोरीच्या ठिकाणी जात भेट दिली .भूम शहरात चार बीट आमलदार असताना वारंवार चोऱ्याचे प्रमाण वाढत आहे .पोलीस प्रशासन रात्रीच्या वेळी गस्त घालताना दिसत नाही . त्यामुळे वारंवार शहरात चोऱ्या वाढत आहे .मागील काळात एटीएम मधील झालेली चोरी,नगर रोडवरील सुपर बॅटरी या दुकानात झालेली चोरी त्यानंतर चोरटे आता बंद असलेले घरे बघून रोख रक्कम व मुद्देमाल चोरून नेत आहेत .शहरात कोणत्याही प्रकारचा चोरट्यांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही .चोरटे भर वस्तीतील घरामध्ये शिरून चोरी करत आहेत .रात्री शहरात सर्वत्र पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे .पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.