भूम (प्रतिनिधी)- माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सहकारी मित्र धनंजय खारगे यांचे चिरंजीव पार्थ खारगे यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे च्या तंत्रज्ञान विभागातून 2023 या शैक्षणिक वर्षासाठी मेकॅनिकल मटेरियल्स टेक्नॉलॉजी मधील उत्कृष्ट प्रबंधासाठी “फोंबेस मार्शल बेस्ट एम.टेक घिसिस“ सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ह.भ.प.योगेश आसलकर, शाम बागडे, माजी नगरसेवक सागर टकले, अतुल उपरे, रामभाऊ बागडे, प्रतीक खारगे, प्रथमेश खारगे, अनिकेत भुजबळ, आशिष बाबर उपस्थित होते.
