धाराशिव (प्रतिनिधि)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दिना. 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्ताने  विद्यार्थ्यांसाठी  वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज 4 ऑक्टोंबर  रोजी या सप्ताहाचे व अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधक या सप्ताहाचे उद्घाटन धाराशिव येथील मराठवाडा साहित्य परिषदेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष  नितीन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हा सप्ताह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी  शिक्षणमहर्षि डॉ.बापूजी साळुंखू व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नितीन तावडे म्हणाले की , आपल्या मराठी भाषेला खूप वर्षापासूनची परंपरा आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण सातत्याने  संघर्ष केला आणि  संघर्षाला यश आले. अखेर 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता या भाषेचे संवर्धन करणे हे केवळ शासनाचे कार्य नसून तुम्हा आम्हा सर्वाचे आहे. त्यामुळे आपण इतर भाषा बोलतो परंतु त्या भाषा बोलतानाच आपण जास्तीत जास्त बोलण्यात आपल्या मराठी भाषेचा वापर करावा असे आवाहान  त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.छाया  दापके  होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.राजा जगताप  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सप्ताहातील अपक्रमांची माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयातील मराठीच्या प्रमुख प्रा. भाग्यश्री गोंदकर या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अरविंद हंगरगेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  प्रा.डॉ.वैशाली बोबडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनही फॅकल्टीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. सुवर्णा गेंगजे,प्रा.डॉ.मारूती लोंढे अर्थशास्ञ विभाग प्रमुख यांचे सहकार्य मिळाले.    

 
Top