धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (जागांच्या आरक्षणाची  पद्धत व चक्रानुसार) नियम,2025 जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.

यासाठी खालील ठिकाणी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे.सभेची तारीख 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आहे.धाराशिव जिल्हा परिषद स्थळ : कै.वसंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद,धाराशिव,पंचायत समिती, भूम,स्थळ :क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,भूम,पंचायत समिती, वाशी,स्थळ : तहसील कार्यालय, वाशी.पंचायत समिती,कळंब,स्थळ : पंचायत समिती सभागृह,कळंब, पंचायत समिती धाराशिव,स्थळ : जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव. पंचायत समिती,परंडा,स्थळ : तहसील कार्यालय सभागृह,परंडा. पंचायत समिती तुळजापूर,स्थळ : पंचायत समिती सभागृह,तुळजापूर. पंचायत समिती,लोहारा,स्थळ : पंचायत समिती सभागृह, लोहारा आणि पंचायत समिती,उमरगा, तहसील कार्यालय,उमरगा बैठक, सभागृह येथे विशेष सभा होणार आहे.

आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना 14 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सादर कराव्यात.जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे.असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

 
Top