धाराशिव (प्रतिनिधी)-  व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या  प्राचार्या  डॉ. पूजा आचार्य यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, लातूर यांच्या तर्फे आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रोथेरपी परिषद – ELECTROCON-25 मध्ये शैक्षणिक तसेच क्लिनिकल कार्यातील प्रभावी योगदानाबद्दल Dynamic Physio Award” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह  पाटील व मार्गदर्शक  करण पाटील  यांचे  सततचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन हेच प्रेरणास्थान ठरले असे डॉ. पूजा आचार्य  यांनी सांगितले. या परिषदेत वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या  प्रथम वर्षाचा संविधान कांबळे याने  सोलो डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक  पटकाविला तर द्वितीय वर्षातील विकास पवार याने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. प्रतापसिंह  पाटील , मार्गदर्शक  करण पाटील  व व्यवस्थापक  अमरसिंह कवडे यांनी  डॉ. पूजा आचार्य  स्पर्धकांचे  अभिनंदन केले.

 
Top