कळंब (प्रतिनिधी)- वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा दिंडी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित वारकऱ्यांना व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करा . कोणीही आत्महत्या करू नका व कोणाला करू देऊ नका अशी शपथ वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक श्री विठ्ठल काकाजी पाटील यांनी सर्व वारकऱ्यांना व शेतकऱ्यांना दिली
वारकरी साहित्य परिषदेच्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार घालून झाली. या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी शेतकरी बंधू आले होते .आलेल्या सर्व वारकरी महिला भगिनी तसेच पुरुष वारकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ तालामध्ये गायला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीहरी चौरे महाराज यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापकीय अध्यक्ष ह भ प विठ्ठल पाटील काकाजी हे होते त्यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटले ज्याप्रमाणे आपल्याला भोजनाची गरज आहे .पण तेच भोजन कामापेक्षा जास्त झालेत आजीर्ण होते. तसे पावसाची आपल्याला अत्यंत गरज असते. परंतु तो मर्यादेपेक्षा आपल्या जिल्ह्यात जास्त झाल्यामुळे शेतकरी वर्गावर ओल्या दुष्काळाची संकट ओढावले आहे. या अस्मानी संकटाला घाबरून न जाता आपण महाराष्ट्रातील शेतकरी हे छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराय यांचे वंशज आहोत. या महान पुरुषांनी कठीण परिस्थितीचा सामना करुन महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यांचे वंशज असल्याकारणाने आपण आत्महत्या न करता लढायला शिका आपण स्वतः आत्महत्या करू नका कोणाला करू देऊ नका. सर्व वारकऱ्यांनी हा ज्ञानोबा तुकोबाचा संदेश घराघरात पोहोचवा असे आव्हान केले आणि अशी शपथ उपस्थितनां दिली.
या कार्यक्रमाच्या वेळी ह .भ.प.सुनीतादेवी अडसूळ वारकरी साहित्य परिषद जिल्हाध्यक्षा, ह.भ.प.बळीराम महाराज कवडे तालुका अध्यक्ष कळंब. अर्जुन महाराज शिंदे तालुकाध्यक्ष भूम, ह. भ. प.साठे महाराज तालुका परंडा ह. भ. प. कुंभार महाराज तालुकाध्यक्ष उमरगा, ह.भ.प.ढगे महाराज तालुकाध्यक्ष तुळजापूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी दिलीप सावंत वारकरी साहित्य परिषद जिल्हा सचिव,ह.भ.प.शोभाताई लंगडे, ह. भ. प. मोहन आप्पा वाघुलकर. संजय माने शिंगोली, अशोक भातलवंडे दहिफळ, ह भ प गुणवंत लांडगे इत्यादीने मेहनत घेतली.