धाराशिव (प्रतिनिधी)- पाचवी ते पदवीधर पर्यंत शैक्षणिक पात्रता असणाऱ्या युवक, युवतींसाठी 28 ऑक्टोबरला धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक, प्राचार्य माने, अमित शिंदे, विकास बारकूल, अण्णा पवार, शांतून पायाळ व तस्मीय शेख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी संभाजीनगर येथे टोयाटो कंपनीने 50 एकर जागा घेतली असून, या जागेत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याप्रमाणे मराठवाड्याती आठही जिल्ह्यात आयटीआय व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये याच पध्दतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जे युवक, युवती बाहेरच्या जिल्ह्यात जावून काम करण्यास इच्छुक आहेत अशा युवक, युवतींने 28 ऑक्टोबरच्या मेळाव्यात नावनोंदणी करावी.
अंतीम टप्प्यात
तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रेल्वेच्या विविध कोर्स संदर्भात बोलताना आमदार पाटील यांनी लातूर येथील रेल्वे कोच तयार करायचा कारखान्यातील प्रोसेस म्हणावी तशी गतीमान नाही. त्यामुळे पुढील एक-दोन महिन्यात रेल्वेचे विविध कोर्सेस आयटीआयमध्ये सुरू करण्यात येथील असे आमदार पाटील यांनी सांगितले.