भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच शेतातील मोठं नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवसेना निरीक्षक बाजीराव चव्हाण, सहसंपर्क प्रमुख भगवान देवकते, यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिवसेना वैद्यकीय जिल्हाप्रमुख पांडुरंग धस, युवासेनेचे विशाल पाटील, अजित पाटील,कानिफ घाडगे, यांनी दोन एकर सोयाबीन काढून मळणी करून देण्यात आली.
या मदतीमुळे आमचा दसरा गोड झाला. शिवसेनेचा दसरा सण हा फक्त मेळावा नाही तर समाजकारण आणि सेवाभावाचा सण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरोखरच शेतकऱ्यांचे कैवारी आहेत हे या माध्यमातून सिद्ध झाले असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेबांनी आज शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. पूरग्रस्तांना मदत, आधार देणे हेच यंदाच्या शिवसेनेचे दसऱ्याचे खरे तोरण ठरले आहे.