तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमा दिनी लाखो भाविक तिर्थक्षेत्र तुळजापूरात यात काही लाख पायी काही खाजगी वाहनांनी येतत मात्र,, पोलिस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली तुळजापूरकडे येणारी वाहने तब्बल अनेक किलोमीटर अंतरावरच अडवण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे भाविक, प्रवासी आणि स्थानिक नागरिक या सर्वच वर्गांत संतापाची लाट उसळली असून, “वाहनतळे शहराबाहेर तयार आहेत, तरीही वाहने इतक्या लांब का अडवली जातात?” असा प्रश्न विचारला जात आहे. शहरातील मोठ्या संखेने शासकीय व खाजगी वाहनतळांची निर्मीती केलि असुन यात वीस हजार आसपास वाहने थांबु शकतात माञ रविवारी ही सर्व वाहन तळे रिकामी असतानाही पोलिसांनी तालुका सीमेपलीकडे, अनेक किलोमीटरवरच वाहने थांबवली त्यामुळे यात्रेकरूंची गैरसोय वाढली आहे.पोलिसांच्या या अजब धोरणामुळे भाविक व्यापारी तालुका वासियांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
तुळजापूर शहराला चारही बाजूंनी बायपास रस्त्यांचा वेढा आहे, त्यामुळे आत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता कमी आहे. तरीदेखील धाराशिव पोलीस यंत्रणेने तालुका हद्दीबाहेरच वाहने अडवून भाविकांना त्रास देणे समजण्यास कठीण असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
एकंदरीत, “नवरात्रात निसर्गाने मारले, आता पोर्णिमेत बंदोबस्ताने ”अशी भावना भक्तांमध्ये निर्माण झाली असून, प्रशासनाने या अडवणुकीच्या निर्णयाचा पुनर्विचार करून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.