धाराशिव (प्रतिनिधी)- समोरील संघ कितीही बलाढ्य असो मात्र सरावात सातत्य ठेवत मैदानावर घाम गाळणारा खेळाडू प्रतिस्पर्धी संघास चितपट करण्याची धमक ठेवत मैदानही गाजवितो. वास्तविक आयुष्यातही खेळ खेळाडूंना कठीण परस्तिथीशी झुंज देण्याची धमक देत असून खेळ खेळाडूंचे आयुष्य घडवीत असल्याचे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले.
धाराशिव जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने आयोजित सब जुनिअर वयोगटातील जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा अधिकारी बी. के. नाईकवाडी, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्ष अतुल अजमेरा, सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, तांत्रिक समिती प्रमुख नितीन जामगे, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे आदींसह खेळाडू, पालक, संघटनेचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींची प्रमुख उपस्तीथी होती,
धाराशिव येथील जिल्हा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रावर इंडियन. रिकर्व्ह आणि कंपाउंड राउंड प्रकारात या स्पर्धा घेण्यात येत आहेत. स्पर्धेतून महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अधिपत्याखाली हिंगोली हिंगोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीने हिंगोली येथे होत असलेल्या सब जुनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील धनुर्धरांची निवड करण्यात येणार आहे.