उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील येथे दाळिंब वळण न दिसल्यामुळे रोड दुभाजक ओलांडून एक कार दुसऱ्या कारवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात जागीच चार ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. 21 ऑक्टोबर रोजी पहाटे केए 38 एम- 9946 या कारमध्ये पाच जण सोलापूर कडून हैद्राबाद कडे जात होते. तर एम एच 14 ईपी 0732 ही कार हैद्राबाद कडून सोलापूरच्या दिशेने जात होती. दाळिंब गावाजवळ एका वळणावर दिशादर्शक फलक नसल्यामुळे एक कार रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या मारूती कारवर आदळल्यामुळे मारूती कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये रतिकांत मारूती बसगौंडा वय 30 वर्षे, शिवकुमार चितानंद वग्गे वय 26 वर्षे, संतोष बजरंग बसगौंडा वय 20 वर्षे, सदानंद मारूती बसगौंडा वय 19 वर्षे सर्व राहणार खाशामपूर ता. जि. बिदर, कर्नाटक राज्य येथील आहेत. तर या अपघातात दिगंबर जगन्नाथ संगोळघी वय 31 वर्षे, राहणार खाशामपूर हे गंभीर जखमी झाले आहेत.
गंभीर जखमी झालेल्या दिगंबर जगन्नाथ संगोळघी यांना येणेगूर आरोग्य केंद्रात मधून उमरगा येथील आरोग्य केंद्रात येथे हलवण्यात आले. अपघात एवढा भीषण होता की मारूती कारमधील चौघेजण जागीच ठार झाले. मुंबई-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग असून, गेल्या अनेक वर्षापासून या महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर नेहमीच अपघा तहोत असतात. तरी सुध्दा राष्ट्रीय महामार्ग निगमला यांचे काहीच वाटत नाही. झालेल्या अपघातामुळे उमरगा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, हे कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मुरूम पोलिस करीत आहेत.

