तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख नंदू राजेनिंबाळकर, महिला आघाडी जिल्हा संघटक शामल वडने, ऋषिकेश मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी तुळजापूर नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.
या बैठकीत येणारी तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्यात येणार आहे. आघाडीचा उमेदवार हा सर्वसामान्य, प्रामाणिक आणि जनतेच्या हिताचा विचार करणारा असेल. नागरिकांनी या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याची वेळ आता आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर नगरपालिकेत सत्तेतून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सत्ता असा खेळ सुरू आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न मागे पडले आहेत आणि अवैध धंद्यांना चालना मिळाली आहे. अशी टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
यावेळी या वेळी उपस्थित जिल्हा समन्वयक शाम पवार, माजी शहर प्रमुख सुधीर कदम, कमलाकर चव्हाण, शहर प्रमुख राहुल खपले, शहर संघटक अर्जुन साळूंके उप शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी,महिला आघाडी शहर संघटिका शोभा शिंदे, मिना ताई कांबळे, युवा सेना शहर प्रमुख, सागर इंगळे, स्वरूभ कांबळे, महावीर कंदले, अनमोल साळुंके, सरदारसिंग ठाकूर, भरत जाधव, विकास भोसले, नवनाथ जगताप, उप तालुका प्रमुख रोहित चव्हाण, असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
