धाराशिव (प्रतिनिधी)- सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी धाराशिव येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नोकरी महोत्सव व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत पुष्पक मंगल कार्यालयात हा मेळावा होणार असल्याची माहिती आयोजक तथा भाजपाचे युवा नेते शंतनू पायाळ यांनी दिली.

या नोकरी महोत्सवात पाचवी ते पदवीधर उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार विविध कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरी महोत्सवात भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, नेते तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी <https://shantanupayal.jobfairindia.in/> या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करून नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोजक शंतनू पायाळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  9076200551, 9076200552 व 9076200553 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

 
Top