तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूरातील व्यापारी वर्गाला नवी दिशा देण्यासाठी आणि संघटनेत उत्साहाचे नवे वारे निर्माण करण्यासाठी भाजप व्यापार आघाडीच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी युवा उद्योजक राहुल भोसले यांची निवड करण्यात आली आहे. हा निर्णय तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेतृत्व विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

राहुल भोसले हे अल्पावधीत आपल्या उद्योजकतेबरोबरच सामाजिक बांधिलकीसाठी ओळखले जातात. वृक्षारोपण, उन्हाळ्यातील पाणपोई उपक्रम, तसेच सामाजिक कार्यांमधील त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांना शहरातील व्यापारी व युवा वर्गात विशेष स्थान आहे. या प्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  यांनी राहुल भोसले यांना नियुक्तीपत्र प्रदान करून अभिनंदन केले. तालुकाध्यक्ष आनंद कंदले म्हणाले की, “भोसले यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी वर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील, तसेच भाजपा व्यापार आघाडी तुळजापूरात अधिक सक्षमपणे उभी राहील.”

भोसले यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले कि, “व्यापारी वर्गाचा आवाज ठोसपणे मांडत, नव्या ऊर्जेने आणि समन्वयाच्या भावनेने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा माझा निर्धार व्यक्त केला या निवडीचे सर्वच स्तरातुन स्वागत केले जात आहे.

 
Top