तुळजापूर (प्रतिनिधी)- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात  इतर प्रभागांतील मतदारांची नावे, तसेच मयत व्यक्तींची आणि दुबार नोंदी असल्याचे निदर्शनास आले आहे.या प्रकरणी समाजसेवक सुनिल हनुमंत घाडगे यांनी नगरपरिषद निवडणूक विभागाला निवेदन देऊन मतदार यादीची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

घाडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक 6 मधील काही मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाविष्ट झालेली आहेत. सध्या प्रभाग 8 मध्ये 3095 मतदार दाखविले गेले असले, तरी दुबार नावे, मयत व्यक्तींची नावे आणि इतर प्रभागातील नावे कमी केल्यास प्रत्यक्ष मतदारसंख्या कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.“मतदार यादीतील गोंधळामुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येत आहे. तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्यात यावी,”  अशी मागणी सुनिल घाडगे यांनी केली आहे.

 
Top