धाराशिव (प्रतिनिधी)- अण्णा हजारे यांच्या लोक आंदोलन न्यासाच्या धाराशिव जिल्हा कार्यकारणीची निवड आज एका छोटेखानी कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. यावेळी पद्मविभूषण अण्णा हजारे यांचे विश्वस्त राष्ट्रीय कार्याध्यक्षा श्रीमती कल्पना इनामदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कमल टावरी, दत्ता आवारी आणि अन्सारभाई शेख उपस्थित होते. या निवडीत मनोज खरे यांची जिल्हा अध्यक्षपदी, तर बेंबळी येथील गालिबखान पठाण यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
जिल्हा कार्यकारणी खालीलप्रमाणे:
जिल्हाध्यक्ष: मनोज खरे, जिल्हा उपाध्यक्ष: गालिबखान पठाण, कोषाध्यक्ष: ज्ञानेश्वर गरड, प्रसिद्धीप्रमुख: मनोज जाधव, सचिव: बापू कदम, तालुका
कार्यकारणी: धाराशिव तालुका:उपाध्यक्ष: दादा मुळे, सचिव: सूरज माळी, सहसचिव: लहू शिंदे, तालुका प्रसिध्द प्रमुख, विठ्ठल खटके, तुळजापूर तालुका:
अध्यक्ष: लक्ष्मण नन्नवरे, कळंब तालुका:अध्यक्ष: प्रीतम जाधव, उपाध्यक्ष: अमित माळी, परंडा तालुका:अध्यक्ष: प्रशांत नांगरे, लोहारा तालुका: अध्यक्ष: विवेकानंद स्वामी, उपाध्यक्ष: बसवराज पाटील, वाशी तालुका: अध्यक्ष: दिलीप मोहिते, उमरगा तालुका: अध्यक्ष: प्रदीप बलसोरे, उपाध्यक्ष: नेताजी जमादार
भूम तालुका- अध्यक्ष-अँड.विद्या हावळे. या कार्यक्रमाला परमेश्वर चिखलीकर,अनिल चंदने, औदुंबर राऊत, किरण जगदाळे, लक्ष्मण इसाके, भुंजग माळी, बापू देडे, आण्णा कटारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारणीने लोक आंदोलन न्यासाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.