तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे कार्तिक सोहळ्यासाठी तेरहून पंढरपूरला 23 आक्टोंबरला प्रस्थान होणार आहे.
पालखीचा शुभारंभ सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे व निरीक्षक अतुल नळणीकर यांच्या हस्ते होणार आहे.23 आक्टोंबरला पालखीचा हिंगळजवाडी येथे मुक्काम,24 आक्टोंबरला वरूडा येथे मुक्काम, 25आक्टोबरला धाराशिव येथे मुक्काम, 26 आक्टोंबरला भातंबरे येथे मुक्काम, 27 आक्टोंबरला वैराग येथे मुक्काम,28 आक्टोंबरला यावली येथे मुक्काम, 29 आक्टोंबरला खैराव येथे मुक्काम, 30 आक्टोंबरला अनगर येथे मुक्काम, 31 आक्टोंबरला रोपळे येथे मुक्काम,1 नोव्हेंबरला सकाळी पंढरपूर येथे आगमन व 5 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला काल्याचा कार्यक्रम करून येवती येथे मुक्काम,6 नोव्हेंबरला खंडोबाचीवाडी येथे मुक्काम,7 नोव्हेंबरला कुंभेज येथे मुक्काम,8 नोव्हेंबरला कापसेवाडी येथे मुक्काम,9 नोव्हेंबरला काळेगाव येथे मुक्काम,10 नोव्हेंबरला हाकत पिंपरी येथे मुक्काम,11 नोव्हेंबरला कौडगाव येथे मुक्काम,12 नोव्हेंबरला सांजा येथे मुक्काम,13 नोव्हेंबरला काजळा येथे मुक्काम, 14 नोव्हेंबरला श्री संत गोरोबा काका यांच्या पालखीचे तेर येथे आगमन होणार आहे. पायी दिंडी पालखी सोहळ्यात भाविक भक्त यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, निरीक्षक अतुल नळणीकर, व्यवस्थापक साहेबराव सौदागर यांनी केले आहे.