भूम (प्रतिनिधी)- तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरक परिस्थिती निर्माण होऊन शेती वाहून गेल्याने अतिव्रष्टीच्या पावसाने परिसरातील सर्व पिके वाहून गेल्याने, सध्या चारा टंचाई निर्माण झाली आहे. शासनाने तात्काळ जनावरासांठी चारा उपलब्ध करुन देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे

भूम तालूक्यामध्येमोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती वाहून गेल्यामुळे  जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील शेतकरी जनावरांना चारा पुरवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. यामुळे जन्मरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे दिनांक 17 रोजी मौजे चांदवड येथील रहिवाशी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार जयवंत पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती केली असुन, आमचा कुटूंबाचा सर्वस्वी कुटूंबाचा आधार शेती आणि दुध उत्पादन हाच आहे. यावर्षी भूम तालुक्यात सरासरी पेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाच, तुडूंब वाहून अनेक तलाव फुटले पावसाच्या अतिव्रष्टीच्या पाण्याने शेकडो शेतक-यांच्या जमिनीतील पिके, माती वाहून जाऊन अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाहून गेल्याने पशुपालक शेतक-यांचे उत्पन्न बुडाले, शिवाय पशुपालकांच्या

चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात कोठेहि चारा उपलब्ध नाही.चांदवड भागातील जनावरांसाठी तात्काळ चारा उपलब्ध करुन देवून पशुपालक शेतक-ना आधार दयावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांसह विधानसभा प्रमूख प्रल्हाद आडागळे जिल्हा सहसंघटक भगवान बांगर , माजी शहर प्रमुख दिपक मुळे , विहंग कदम , बाळसाहेब गुळवे ' उपतालुकाप्रमुख बापूसाहेब कावळे, ऋतुराज काकासाहेब खोसे ,सुंदर खोसे सुरज खोशे यांच्यासह शेतकरी उपस्थित होत


काही दिवसांपूर्वी या भागांमध्ये पशुवैद्यकीय विभागामार्फत चाऱ्याचे वाटप करण्यात आलेले आहे. खरोखरच या भागांमध्ये परिस्थिती गंभीर असून भूम तालुक्यातील काही भागांना चाऱ्याची कमतरता भासत असल्याने चाऱ्या अभावी उपाशी राहू नयेत यासाठी संबंधित विभागांना मी या अगोदरही सांगितले असून आता देखील आपल्या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तात्काळ चारा पुरवण्याचे काम करू.

 -जयवंत पाटील भूम तहसीलदार

 
Top