तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजाई नगरीत दिपावली सण पारंपरिक धार्मिक कार्यक्रम होवुन साजरा करण्यात आला. दिपावली सण पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी होत असुन, नरकचतुर्थी दिनी पहाटे देविजींना अभ्यंगस्नान घालण्यात आले. तर राञी भेंडोळी उत्सव संपन्न झाला. तर दीपावली पाडव्या दिनी देविजींना शिवकालीन प्राचीन अलंकार घालण्यात आल. दिपावली सोहळा सांगता दिपावली पाडवा दिनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी संस्कार भारती आयोजीत रंगोत्सवाचे उदघाटन केले. भाऊबीजेचा सोहळ्याने दिपावली सणाचा सांगता झाला. दिपावली पाडव्या दिनी कमानवेशेत पारंपरिक म्हशी पळवाण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दिपावली सुट्यांन पार्श्वभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुट्टीच्या काळात मंदिर 2 नोव्हेबर 2025 पर्यत पहाटे 1.00 वाजता चरणतिर्थ होवुन धर्मदर्शनार्थ खुले केले जाणार आहे. भाऊबीजे दिवशी श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांनी खच्चुन भरुन गेल्याने सुरक्षा यंञणेवर ताण येताच दुपारी मंदीरचे अधिकारी कर्मचारी अँक्शन मोडवर येवुन दर्शन रांगा भरभर हलवल्याने मंदीरातील गर्दीवर नियंत्रण आणले. यावेळी अनुभवी मंदीर अधिकारी कर्मचारी नागेश शितोळे, जयसिंग पाटील, गणेश नाईकवाडी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी संपुर्ण स्टाफ गर्दीवर नियंत्रणसाठी मंदीरात कार्यान्वित होता. भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनाने आल्याने शहरातील वाहतुक यंञणा कोलमडली याचा फटका भाविकांना बसला.


