धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक 8 व 9 ऑक्टोबर 2025 रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकलव्य संकुल मंगरूळ यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून अनेक स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर यश संपादन केले आहे.

14 वर्षे वयोगट (मुले / मुली)- 600 मीटर धावणे  विश्वजीत जाधव (प्रथम क्रमांक), अबोली माने (तृतीय क्रमांक), 400 मीटर धावणे  ओमकार निंबाळकर (प्रथम क्रमांक), 80 मीटर हर्डल्स  विश्वजीत जाधव (प्रथम क्रमांक), ओमकार गंधेवार (द्वितीय क्रमांक).

17 वर्षे वयोगट (मुले / मुली)- 3000 मीटर धावणे  ज्योतीराम पवार (द्वितीय क्रमांक), 400 मीटर हर्डल्स  शिवराज मरिआईवाले (प्रथम क्रमांक), 110 मीटर हर्डल्स  सार्थक माळकर (तृतीय क्रमांक), क्रॉस कंट्री (मुली 3 कि.मी.)  धनश्री जाधव (प्रथम क्रमांक). या सर्व स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून एकलव्य संकुलाचा जिल्हास्तरावर झेंडा फडकवला आहे. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या विजयानंतर खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, यशवंत निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे तसेच संस्थेचे संचालक मंडळ, क्रीडा समितीचे सर्व सदस्य व शिक्षकवृंद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top