भुम (प्रतिनिधी)- 17 वर्षीय वयोगटात व 60 किलो वजनी गटात झालेल्या विभाग स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रशालेच्या रोहित माने या मल्लाने सलग चार वर्ष प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान मिळवला आहे. व आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे व मार्गदर्शक क्रीडा प्रशिक्षक अमर सुपेकर (कबड्डी कोच) यांचे प्रशालेच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सचिव आर.डी.सुळ, मुख्याध्यापक उत्तम सुरवसे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे तसेच धनंजय पवार, भागवत लोकरे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
